-->

आजचे भविष्य (बुधवार, 17 फेब्रुवारी 2021)

मेष : व्यवसायात खेळत्या भांडवलाची तरतूद करावी लागेल. कृतीवर भर देऊन कामे वेळेत संपवा.

वृषभ : उलाढाल वाढवण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. नोकरीत अनपेक्षित लाभ मिळेल. प्रवासाचे योग येतील.

मिथुन : फायदयाचे प्रमाण वाढेल. नवीन कामे हितचिंतकांच्या मदतीने मिळतील. ईप्सित साध्य होईल.

कर्क : कामाचे गणित बसवून कामे संपवा. धावपळ दगदग जरी वाढली तरी आर्थिक लाभही वाढणार आहेत.

सिंह : व्यवसायात हटवादी स्वभावामुळे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्या. नवीन कामे दृष्टीक्षेपात येतील.

कन्या : जुनी येणी वसुलीवर लक्ष केंद्रित केलेत तर पैशाची ऊब मिळेल. मोहापायी चुकीच्या व्यक्तिंशी संगत टाळा.

तूळ : कधी शक्ती तर कधी युक्तीने उलाढाल व विक्री वाढवाल. नवीन कामे मिळतील. नोकरीत नवीन दिशा मिळेल.

वृश्‍चिक : बेत प्रत्यक्षात साकार होतील. टाळता न येणारे खर्च करावे लागतील. भविष्यात त्यातून फायदाच होईल.

धनु : व्यवसायात वेळ व काळाचे बंधन पाळून काम करण्याचा मानस असेल. त्यामुळे मोठी उडीही घेता येईल.

मकर : कार्यपद्‌धतीत बदल करून उलाढाल व फायदा वाढवण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होईल.

कुंभ : व्यवसायात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी ठोस पावले उचलाल. जोडधंदयातून विशेष लाभ होईल.

मीन : बाजारातील चढउतारांकडे मात्र लक्ष ठेवावे लागेल. खेळत्या भांडवलाची तरतूद करावी लागेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.