आजचे भविष्य (मंगळवार, 9 मार्च 2021)

मेष : कामानिमित्ताने नवीन हितसंबंध जोडले जातील. किचकट कामे हातावेगळी कराल.

वृषभ :घरात तुमचे विचार इतरांना पटतील. सहमती मिळेल. कामात यश मिळाल्याने उत्साह व जोम राहील.

मिथुन : प्रकृतीमान सुधारेल. महिलांना मानसिक समाधान मिळेल. तुमचे सुप्त कलागुण दाखवण्याची संधी मिळेल.

कर्क : व्यवसायात पूर्वी योजून घेतलेल्या निर्णयाचा लाभ होईल. आर्थिक झालेली कुचंबणा कमी होईल.

सिंह : नवीन कामे मिळाल्याने तुमची उमेद वाढेल. नोकरीत नवीन आव्हाने पेलावी लागतील.

कन्या : पैशाची स्थिती थोडी नाजूकच राहील. बदल किंवा बदलीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल.

तूळ : घरात तुमचे धोरण लवचिक ठेवा. खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे होईल. आनंदाचा सोहळा साजरा कराल.

वृश्‍चिक : तरुणांना हुरुप येईल. सुवार्ता कळेल. महिलांना कौतुकाची थाप मिळेल. प्रकृतीची काळजी घ्या.

धनु : बराच काळ तुमची झालेली गैरसोय कमी होईल. व्यवसायात अडचणींवर मात करुन प्रगती कराल.

मकर : व्यक्तिंचे मिळालेले सहकार्य तुमचा ताण कमी करेल. अस्थिरताही कमी झाल्याने मानसिक समाधान मिळेल.

कुंभ : देणी देता आल्याने जमा खर्च सारखाच राहील. नोकरीत रटाळ काम संपवण्याकडे तुमचा कल राहील.

मीन : वरिष्ठ व सहकारी कामात मदत करतील. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. रागावर नियंत्रण ठेवा.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.