मेष : खेळाडू, कलाकारांना प्रतिभा दाखवता येईल. अत्यंत धोरणी राहून भविष्याची तरतूद कराल.
वृषभ : व्यवसायात आवश्यक ते बदल करून यश मिळवाल. पैशाची चिंता मिटेल.
मिथुन : इतरांना कठीण वाटणारी कामे तुम्ही सहजपणे करू शकाल. “”शब्द हे शस्त्र आहे” हे लक्षात ठेवा.
कर्क : महिलांनी कामात सतर्क राहावे. एखाद्या शुभकार्याच्या निमित्ताने कलागुण दाखवण्याची संधी मिळेल.
सिंह : आरोग्य चांगले राहील. नोकरीत इतरांचे सहकार्य कसे मिळवता यावर तुमचा कामाचा ताण अवलंबून राहील.
कन्या : भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानून कामे कराल. व्यवसायात कामात चोखंदळ राहाल. कामानिमित्ताने प्रवास घडेल.
तूळ : नवीन कामे हाती घेऊन झपाट्याने पूर्ण करण्याचा मानस असेल. अपेक्षित पत्रव्यवहार होतील.
वृश्चिक : जुनी येणी वसूल झाल्याने पैशाची तजवीज होईल. कामाचा विस्तार करण्याचा बेत सफल होईल.
धनू : अनपेक्षित लाभाची शक्यता नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. त्याचा योग्य उपयोग करा.
मकर : महिलांनी मात्र कुणावरही विसंबून राहू नये. रागावर नियंत्रण ठेवावे. झेपेल तेवढेच काम करावे.
कुंभ : व्यवसायात कामाचा ताण वाढला तरी कामाचे समाधान मिळेल. त्यामुळे त्रास जाणवणार नाही.
मीन : दिलेला शब्द पाळण्यासाठी अथक परिश्रम घ्याल. खेळत्या भांडवलाची तरतूद करावी लागेल.