लोक मनःशांतीसाठी आणि त्यांच्या पापांचा पश्चात्ताप करण्यासाठी मंदिराला भेट देतात. मात्र थायलंडमध्ये एक असे मंदिर आहे जे “नरका” पेक्षा कमी दिसत नाही! ‘वॅट मे कॅट नोई’मंदिर, ज्याला चियांग माई मधील नरक मंदिर म्हणूनही ओळखले जाते. या मंदिरात असे काय आहे, ज्यामुळे त्याला हे विचित्र नाव मिळाले, चला, आज सविस्तर जाणून घेऊया.
या मंदिरात अशी अनेक भीषण आणि भयानक शिल्पे आहेत, असे मेलऑनलाईनचे वृत्त आहे. याशिवाय अशा अनेक रचना आहेत ज्या यातना आणि त्रास दर्शवतात. ही सर्व रचना एका साधूने उभी केली होती, ज्याला पाप केल्याने काय परिणाम होतात, हे भक्तांना दाखवायचे होते.
वाढदिवस, लग्न आणि अंत्यसंस्कारासाठीही हे मंदिर आकर्षणाचे केंद्र बनले आहे. या मंदिराची स्थापना बौद्ध भिक्षू प्रा क्रु विशांजलिकॉन यांनी केली होती. ज्याच्या मनात मंदिराची कल्पना होती. त्याने सांगितले की मला लोकांना घाबरवायचे आहे. मला त्यांना नरक आणि पापाच्या परिणामांना दाखवून घाबरवायचे होते. जेणेकरून त्यांना त्यांच्या कृत्यांची लाज वाटावी .