नवी दिल्ली – बॉलिवूड व पंजाब चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक योयो हनी सिंग उर्फ हिरदेश सिंग याच्या विरोधात त्याची पत्नी शालीनी तलवार हिने कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली आहे.
View this post on Instagram
तिने दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयात मुख्य न्यायदंडाधिकारी तानिया सिंग यांच्या कडे ही तक्रार दाखल केली आहे. तिने याच बरोबर मीडिया आणि सोशल माध्यमांशी ही बोलून हनी सिंग आणि त्याचा कुटूंबियांवर आरोप केले आहे.
View this post on Instagram
त्यामुळे सध्या सोशलवर हनी सिंग आणि त्याचा कुटूंबियांवर टीका केली जात आहे यावर आता हनी सिंग ने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. त्याने त्यांचा इंस्टाग्राम पेज वर पोस्ट केली आहे की,’गेल्या २० वर्षांपासून शालिनी तलवार माझी पत्नी आहे.
View this post on Instagram
माझ्या पत्नीने माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर अनेक आरोप केला आहे. मात्र हे सर्व आरोप खोटे आहे. मला वर माझ्या कुटूंबियांना या आरोपांमुळे फार दुःख झाले आहे.’
View this post on Instagram
त्याने पुढे लिहिले आहे की,’मागील काही वर्षांमध्ये माझ्या आरोग्या विषयी तसेच करिअर आणि गाण्यांविषयी अनेक खोट्या चर्चा रंगल्या होत्या .
View this post on Instagram
त्यावेळी मी कधी त्या नकारात्मक गोष्टींवर प्रतिक्रिया दिलेली नाही, मात्र यावेळी शालिनीने केलेल्या आरोपांमुळे माझ्या वृद्ध पालकांवर आणि धाकट्या बहिणीवर आरोप केले हे सगळे आरोप बदनाम करणारे आहेत. त्यामुळेच मी माझी भूमिका सोशलच्या माध्यमातून देत आहे .