‘हा’ आयुर्वेदिक काढा वाढवेल तुमची 100 टक्के रोगप्रतिकारक शक्ती

जर तुम्ही हा उपाय अमलात आणला तर तुम्हाला याचा फायदा नक्की होईल...

पुणे – कोरोना विषाणूमुळे जगभरात दहशत पसरली आहे. भारतातही संक्रमित लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या धोकादायक विषाणूची लागण टाळण्यासाठी अनेक गाईड लाइन देखील जारी केल्या आहेत. लोकांना वेळोवेळी हात स्वच्छ करण्यास सांगितले गेले आहे.

दरम्यान, या विषाणू पासून आपले संरक्षण करण्यासाठी खाली दिलेला आयुर्वेदिक काढा खूप उपयोगी आहे. जर तुम्ही हा उपाय अमलात आणला तर तुम्हाला याचा फायदा नक्की होईल.

आयुर्वेदिक काढा कसा बनवावा ?

या काढ्यामध्ये गुळवेल (गुडूची), तुळशीची पानं, सुंठ, मिरे, दालचिनी, जिरे, गुळ किंवा खडीसाखर घालून काढा तयार करावा व रोज दिवसातून 2 वेळा सकाळी व संध्याकाळी घ्यावा…

गुळवेल पावडर- दोन भाग

तुळशीची पानं- चार भाग

सुंठ पावडर- दोन भाग

दालचिनी पावडर- दोन भाग

काळी मिरी पावडर- एक भाग

जिरे पावडर- दोन भाग

गुळ किंवा खडीसाखर- आवश्यकतेनुसार

 

या औषधी घटकांचे जाडसर पावडर तयार करणे. सगळी औषधे सांगितलेल्या प्रमाणानुसार जाडसर पावडर तयार करून एकत्र करणे. एकत्र केलेल्या औषधीचे साधारण तीन ग्रॅम (1 छोटा पोह्याचा चमचा प्रमाणात) जाडसर पावडर 100 मिलिलिटर पाण्यात मिसळून निम्मे होईपर्यंत उकळावे. नंतर हा काढा गाळून प्यावा. हा काढा कोरोना पासून व कोरोनासारख्या इतर विषाणुंपासून तुमचे संरक्षण करण्यासाठी नक्कीच फायद्याचा ठरेल.

Leave A Reply

Your email address will not be published.