पुणे – थर्ड आय स्पोर्टस अँड इव्हेंटस एलएलपी यांच्या वतीने आयोजित पहिल्या थर्ड आय १६ वर्षाखालील क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्य फेरीत आर्यन्स क्रिकेट अकादमी व पीवायसी हिंदु जिमखाना या संघानी अनुक्रमे सहारा क्रिकेट अकादमी व स्पोर्टिव्ह क्रिकेट अकादमी संघाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
सनराईज क्रिकेट स्कुल येथील मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत अथर्व वैद्य(नाबाद ५९ धावा व २-११)याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर पीवायसी हिंदू जिमखाना संघाने स्पोर्टिव्ह क्रिकेट अकादमीचा ९ गडी राखून पराभव केला. पीवायसीच्या अर्जुन सोनार ४-३५, अथर्व वैद्य २-११ यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीपुढे स्पोर्टिव्ह क्रिकेट अकादमीचा ३९षटकात सर्वबाद १५६धावावर कोसळला.
WPL 2024 ( #DCvRCB #Final ) : बंगळुरूचा ‘रॉयल’ विजय, दिल्लीवर मात करत जेतेपदावर केला कब्जा…
यात अभिराज राऊत ३२, हेमांग सिंगल २७, आदेश सोलंकी २५ यांनी थोडासा प्रतिकार केला. हे आव्हान पीवायसी हिंदू जिमखाना संघाने २५.२षटकात २बाद १५७धावा करून पूर्ण केले. यात अथर्व वैद्य नाबाद ५९, ओम सानप नाबाद ४६, श्लोक जोशी २८ यांनी धावा करून संघाला विजय मिळवून दिला. दुसऱ्या सामन्यात आदर्श रावळ(५० धावा व ३-२४)याने केलेल्या सुरेख खेळीच्या जोरावर आर्यन्स क्रिकेट अकादमी संघाने सहारा क्रिकेट अकादमीचा १३५ धावांनी पराभव करून अंतिम फेरी गाठली.