पुणे – पावसाळा सुरू झाला की निसर्गाच्या सानिध्यात जाऊन मनसोक्तपणे पावसात भिजण्याचा आनंद हा प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. मित्रांसोबत, कुटुंबासोबत फिरायला जाण्याचा प्लॅन केला जातो. मात्र कुठे जायचे? हा प्रश्न अनेकांना पडतो. आज आम्ही तुम्हाला अशाच पुण्यापासून जवळची पावसाळ्यात फिरायला जाण्यासाठीच्या ठिकाणांची माहिती देणार आहोत.
पुण्याजवळील काही निवडक निसर्गरम्य पावसाळी पर्यटन स्थळे –
1 लोणावळा –
लोणावळा हे पुण्यापासून 64 किमी तर मुंबईपासून 96 किमी अंतरावर आहे. लोणावळ्यात पर्यटक फार दुरून विश्रांतीसाठी येत असतात, आपल्या सुट्टीचा आनंद घेतात. लोणावळ्यात भुशी धरण, राजमाची पॉइंट, लॉयन्स पॉइंट, टायगर पॉइंट, टायगर लिप, इमॅजिका थीम पार्क असे काही ठिकाणं लोणावळ्याला आहेत. सह्याद्रीच्या कुशीत असलेले लोणावळा या ठिकाणी उंच झाडी, खोल दऱ्या, पावसाळ्यात उंच डोंगरांवरून कोसाळणारे धबधबे पर्यटकांना भुरळ घालतात. त्याचमुळे लोणावळ हे प्रेक्षणीय स्थळ लोकांचे नेहमीच आवडीचे ठरले आहे.
2 ताम्हिणी घाट –
सह्याद्रीच्या पर्वत रांगेत असलेला हा ताम्हिणी घाट म्हणजे अतिशय निसर्गरम्य ठिकाण आहे. हा घाट पुणे ते कोकण प्रवास करत असताना लागतो. मुळशीच्या थोडं पुढे गेले की महाडच्या दिशेने जातांना हा घाट लागतो. चोहिकडे डोंगर, दऱ्या ,हिरवळ, ओसंडून वाहणारे धबधबे, वळनाचे रस्ते पाहायला मिळतात. सोबतच मानगांव जवळच देवकुंड धबधबा आहे, तिथूनच पुढे 3 किलोमिटरच्या अंतरावर कुंडलीका व्हॅली आहे. हा सर्व परिसर वर्षभर हिरवागार असतो व वार्षिक सरासरी तापमान 19 ते 33 अंश सेल्सिअस इतके असते. ताम्हिणी घाटात गेल्यावर राहण्यासाथी रिसॉर्ट, हॉटेल्स आहेत. याठिकाणी तुम्ही मुक्कामही करू शकता.
3 पवना लेक-
पवना लेक हे पुण्याजवळील सुंदर व आकर्षित ठिकाण आहे. हे लोणावळा रेल्वे स्थानकापासून 20 किमी अंतरावर आहे. पवना लेक हा एक कृत्रिम तलाव आहे. पवना नदीवर बांधलेल्या पवना धरणातून पवना तलाव तयार होतो.. जो कॅम्पिंग, फिशिंग आणि वॉटर स्पोर्ट्स यासारख्या अनेक साहसी उपक्रमांसाठी ओळखला जातो.
4 माथेरान –
माथेरान हे पुण्यापासून 100 किमीच्या अंतरावर आहे तर मुंबईपासून 110 किमी अंतरावर आहे. सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी नेहमीच गर्दी असते, तसेच पावसाळ्यात येथे पर्यटकांची गर्दी वाढते. माथेरान म्हटले म्हणजे टॉय ट्रेन आलीच ह्या टॉयट्रेन मध्ये बसल्यानंतर मोहक निसर्गाचाआनंद तुम्ही घेऊ शकता, ही ट्रेन 21 किमी धावते.
5 माळशेज –
माळशेज हे हिल स्टेशन पुण्यापासून 128 किमी अंतरावर आहे. येथे अनेक तलाव, डोंगर, धबधबे, हिरवेगार वनस्पति आणि प्राणी यांच्यामुळे माळशेज घाटाचे सौंदर्य अजून फुलून येते. हिरव्यागार टेकड्या आणि आकर्षक गुलाबी फ्लेमिंगोसह पावसाळ्यात हे ठिकाण विशेषतः सुंदर असते. पावसाळ्यात येथे पर्यटकांची रिघ पाहायला मिळते..
6 महाबळेश्वर-
महाराष्ट्राचे नंदनवन महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण आहे, महाबळेश्वर हे पुण्यापासून 117 किमी अंतरावर आहे. महाबळेश्वर येथील हिरवा निसर्ग, सुंदर बगीचे, उद्याने श्वास रोखायला लावणारी दृश अशी सुंदर प्रेक्षणीय स्थळे पर्यंटंकांना आकर्षित करतात. हवामान जर स्वच्छ असेल तर या पॉईंटवरून रायगड किल्ला, तोरणा किल्ला स्पष्ट दिसतात. याच मार्गावर ‘टायगर स्प्रिंग’, ‘इको पॉईंट’, ‘एलफिस्टन पॉईंट’ आहेत.
7 भिमाशंकर-
भिमाशंकर हे बारा ज्योर्तिलिंगापैकी एक ज्योर्तिलिंग आहे. हे पुण्यापासून 128 किमीच्या अंतरावर आहे. येथे पुरातन देवस्थान आहे, भिमाशंकरचा आजूबाजूचा प्रदेश हा अतिशय घनदाट जंगलानी व्यापलेला आहे. सर्व डोंगर प्रेमीचा आणि ट्रेकर्सचा हा आवडत ट्रेक आहे.
8 सिंहगड –
सिंहगड पुण्यापासून 29 किमी अंतरावर आहे. सिंहगड किल्ला हा मराठा साम्राज्याचा गौरव म्हणून ओळखला जातो. पुण्यापासून सिंहगड जवळच असल्यामुळे सुट्टीच्या दिवशी पुणेकरांची धाव सिंहगडाकडे जास्त प्रमाणात असते.
9 मळवली –
पुण्यापासून लोणावळ्याकडे जाताना मळवली हे ठिकाण लागते. पुण्यापासून मळवली साधारण 59 कमी अंतरावर आहे. मळवलीत भाजे धबधब्याला पावसाळ्यात पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. मळवली परिसरात भाजे आणि कार्ल्याची प्राचीन लेणी, तसेच मराठा साम्राज्याचा इतिहासात उल्लेख असलेले लोहगड व विसापूर हे किल्ले प्रसिद्ध आहेत.
10 लोहगड –
लोहगड किल्ला हा पुण्यापासून 68 किमी अंतरावर आहे. लोहगड किल्ला हा शेजारच्या विसापूर किल्याला एका छोट्या रांगेने जोडलेला आहे. पावसाळ्यात या किल्ल्यावर धुक्याचं पांघरून घातलं जातं.. पावसाळ्यात येथे पर्यटकांची रिघ असते..