आयर्लंड : येथील लिमरीक येथील युवा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत 21 वर्षांखालील पुरुष रिकर्व्ह वैयक्तिक प्रकारात भारतीय तिरंदाज पार्थ साळुंखे याने सुवर्णपदक पटकावले आहे. या प्रकारात सुवर्णपदक पटकावणारा महाराष्ट्राचा 19 वर्षीय पार्थ हा पहिला भारतीय पुरुष तिरंदाज ठरला आहे.
पार्थने 21 वर्षांखालील रिकर्व्ह फायनलमध्ये कोरियाच्या तिरंदाजाला पराभूत केले. पार्थने रँकिंग राऊंडमध्ये सातव्या मानांकित साँग इन जून विरुद्धच्या पाच सेटच्या अटीतटीच्या सामन्यात 7-3 (26-26, 25-28, 29-26, 29-26, 28-26) असा विजय मिळवला.
Parth Salunkhe’s PURE DETERMINATION. 👏
India has the new 2023 World Archery Youth Champion. 🇮🇳🇮🇳🇮🇳#WorldArchery pic.twitter.com/rTDPYDCDBA— World Archery (@worldarchery) July 9, 2023
21 वर्षांखालील महिलांच्या रिकर्व्ह वैयक्तिक स्पर्धेतही भारताने कांस्यपदक जिंकले. कांस्यपदकाच्या लढतीत भाजा कौरने चीनी ताइपेच्या सु सिन-यु हिचा 7-1 (28-25, 27-27, 29-25, 30-26) असा पराभव केला.
भारताच्या मोहिमेचा शेवट सहा सुवर्ण, एक रौप्य आणि चार कांस्य पदकांसह झाला, जे एकूण पदकतालिकेतील सर्वोच्च आहे. संघ मात्र क्रमवारीत कोरियापाठोपाठ दुसऱ्या स्थानावर राहिला तर कोरियाचा संघ सहा सुवर्ण आणि चार रौप्य पदकांसह अव्वल स्थानावर राहिला.
पार्थने भारतासह महाराष्ट्राचे देखील उंचावले नाव…
पार्थ साळुंखेने या कामगिरीने भारतासह महाराष्ट्राचे देखील नाव उंचावले आहे. पार्थ हा खेळाडू साताऱ्याजवळील करंजेपेठचा रहिवाशी असून, त्यांचे वडील सुशांत साळुंखे हे त्यांचे मार्गदर्शक आहेत. करंजे पेठ येथील श्रीपतराव पाटील हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत, तर त्याच्या आई अंजली साळुंखे या याच विद्यालयात ग्रंथपाल म्हणून सेवा बजावत आहेत. पार्थ साळुंखे हा हरियानामधील सोनिपथ येथे प्रशिक्षण घेत असून, त्याचे तेथील प्रशिक्षक राम अवदेस यांच्या मार्गदर्शनात त्यांचा नियमित सराव असतो.