मुंबई – टीम इंडियाचा विकेटकिपर फलंदाज पृथ्वी शॉ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी ही बातमी त्याच्या लग्नाशी संबंधित आहे. पृथ्वी शॉने लग्न केल्याची बातमी सध्या वाऱ्यासारखी व्हायरल होत आहे. याला कारण देखील तसेच आहे. पृथ्वी शॉने स्वतःच त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो शेअर केला आणि लिहिले – हॅप्पी व्हॅलेंटाईन माय वाईफ! मात्र, काही वेळातच त्याने ती पोस्ट डिलीट केली.
पृथ्वी शॉने ती पोस्ट डिलीट केली असली तरी सध्या त्याच्या पोस्टचे स्क्रिनशॉट्स सोशल मीडियामध्ये चांगलेच व्हायरल होताहेत. चाहत्यांना प्रश्न पडला आहे की पृथ्वी शॉचे खरेच लग्न झाले आहे का आणि ती मुलगी नेमकी कोण आहे? आता पृथ्वी शॉने कोणाशी लग्न केले हा मोठा प्रश्न आहे. त्याने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या स्टोरीमध्ये हॅपी व्हॅलेंटाईन डे माय वाईफ असे लिहिताना निधी तापडिया टॅग केले आहे. निधी तापडिया एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे.
याआधीही निधीसोबत पार्टी करतानाचे त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, त्यानंतर त्यांच्या अफेअरच्या बातम्या समोर आल्या होत्या. शॉने पहिल्यांदाच उघडपणे प्रेम व्यक्त केले आहे. यामुळे फॅन्स चांगलेच खुश झाले आहेत.
मात्र पृथ्वी शॉने निधी तापडियासोबतचा फोटो सोशल मीडियावर का शेअर केला आणि नंतर तो का हटवला हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.परंतु शॉने गुपचूप लग्न केल्याचा दावा फॅन्स सोशल मीडियावर करत आहेत.
पृथ्वी शॉ अलीकडेच 18 महिन्यांनंतर टीम इंडियात परतला आहे. त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेचा भाग बनवण्यात आले, परंतु त्याला एकही सामना खेळायला मिळाला नाही. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये तो संघाचा भाग नाही.