नगर -मनपाच्या शहर पाणी पुरवठा योजनेवरील दुरुस्तीच्या कामासाठी उद्या (दि.6) वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या नगर शहरासह उपनगरात पाणी पुरवठा होणार नाही.
सकाळी साडेअकरा ते पाच या कालावधीत वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. त्यामुळे मुळानगर विळद पंपींग स्टेशन येथून होणारा पाणी उपसा बंद राहणार आहे.
त्यामुळे पाण्याच्या टाक्या भरता येणार नाहीत. शनिवारी बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगरातील गुलमोहर रोड, पाईपलाईन रोड, लक्ष्मीनगर, सुर्यनगर, निर्मलनगर, मुकुंदनगर तसेच स्टेशन रोड, सारसनगर, विनायकनगर, केडगाव कल्याण रस्ता, शिवाजीनगर परिसर या भागात पाणी पुरवठा होणार नाही. तर रविवारी सर्जेपुरा, तोफखाना, सिद्धर्थ नगर दिल्लीगेट, नालेगाव, आनंदीबाजार, चितळेरोड, कापडबाजार, माळीवाडा या परिसरात पाणी पुरवठा होणार नसल्याचे मनपाच्या पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे.