दिव्या अग्रवालने घटस्फोटाच्या चर्चांवर दिले स्पष्टीकरण; म्हणाली “कथेचा शेवट…”

Divya Aggarwal Social Media Post| अभिनेत्री दिव्या अग्रवालने बॉयफ्रेंड अपूर्व पाडगावकर यांनी 20 फेब्रुवारी 2024 रोजी लग्नगाठ बांधली. दिव्या व अपूर्व यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर लग्नाचे अनेक फोटो शेअर केले होते. त्यांचे लग्नाचे फोटो व्हायरल झाले होते. मात्र आता लग्नाचे सर्व फोटो दिव्याने डिलीट केले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले आहे. यावर आता स्वत: दिव्याने एक पोस्ट शेअर करत स्पष्टीकरण दिले आहे.
दिव्या अग्रवालने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले की, “मी काहीच बोलले नाही. मी कोणतीही कमेंट किंवा पोस्ट केलेली नाही. मी 2500 पोस्ट हटवल्या. पण लग्नाचे फोटो दिसले नाहीत तेव्हा मीडियाने फक्त त्यावरच प्रतिक्रिया दिली. लोक कसे पाहतात आणि माझ्याकडून काय अपेक्षा करतात हे रंजक आहे. मी नेहमी तेच केले जे लोकांना माझ्याकडून अपेक्षित नव्हते आणि त्यांची काय अपेक्षा आहे -घटस्फोट किंवा बाळ? खरं तर यापैकी काहीही नाही.”
दिव्याने पुढे लिहिलं, “आता फक्त मला माझ्या प्रोफाइलवर पिन केलेल्या पहिल्या पोस्टबद्दल बोलायचं आहे. प्रत्येक कथेचा शेवट आनंदी असतो आणि देवाच्या कृपेने माझे पती माझ्या शेजारी शांतपणे झोपले आहेत आणि घोरत आहेत.” अशी स्टोरी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत दिव्याने घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. Divya Aggarwal Social Media Post|
दरम्यान, दिव्या अग्रवालने 20 फेब्रुवारी रोजी मुंबईत अपूर्वाशी लग्न केले. या लग्नाला काही मोजकेच पाहुणे उपस्थित होते. मात्र अचानक दिव्याने लग्नाचे फोटो हटवल्याने लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यातच या दोघांच्या नात्यात बिनसल्याच्या चर्चा होऊ लागल्या. पण तसं काहीच नसल्याचं स्पष्टीकरण दिव्याने दिले. Divya Aggarwal Social Media Post|
हेही वाचा:
विधानसभेतील जागा वाटपावरील भुजबळांच्या विधानावर फडणवीसांचे प्रत्युत्तर; म्हणाले “भाजप सर्वात…”






