शिक्रापूर- सणसवाडी (ता. शिरूर) येथील नालंदा बौद्धविहार येथील चंदनाच्या आठ झाडांची चोरी झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत नालंदा बौद्धविहारचे व्यवस्थापक सुदाम शंकरराव पवार (रा. सुखवस्तू नालंदा बौद्धविहार सणसवाडी ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संजय ढावरे हे करीत आहेत.