बेल्हे : गुळंचवाडी (ता.जुन्नर) येथील दोन महिलांचा कोरोना अहवाल शनिवार (दि.२५) रोजी सायंकाळी पॉझिटिव्ह आला आहे. तर बेल्ह्यातील चार व्यक्तींचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर ३ व्यक्तींचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.
गुळंचवाडी येथील ६५ वर्षीय दोन महिलांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे या महिला कोणत्याही पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्या नव्हत्या.अशी माहिती बेल्हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.एस. बी.थोरात यांनी दिली. त्यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घेणं आवश्यक आहे.