मुंबई – बॉलिवूड अभिनेता शारुख खान सोबत रुपेरी पडद्यावर काम करणारी अभिनेत्री ‘शिखा मल्होत्रा’ बद्दल एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. शिखाला अर्धांगवायू आणि ब्रेन स्ट्रोक झाला असून, या आजारातून शिखा मल्होत्रा बरी होत आहे. पण तिची रिकव्हरी अतिशय संथपणे चालू आहे. तिला स्वत:च्या पायावर उभं राहता येण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
View this post on Instagram
2016 साली प्रदर्शित झालेल्या ‘फॅन’ चित्रपटात शाहरुख खान सोबत शिखा मुख्य भूमिकेत दिसून आली होती. तसेच संजय मिश्रा यांच्या 2019 साली आलेल्या ‘कांचली’ या चित्रपटात देखील शिखाने महत्वाची भूमिका साकारली. तर तापसी पन्नू बरोबर तिने ‘रनिंग शादी डॉट कॉम’ मध्ये काम केलं आहे.
View this post on Instagram
दरम्यान, शिखा च्या प्रकृती बाबत सांगायचे झाले तर अभिनेत्री शिखा मल्होत्रा काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती. 22 ऑक्टोबरला तिला डिस्चार्ज सुद्धा मिळाला. मात्र काही महिन्यातच पुन्हा एकदा नवीन आजाराने तिला आपल्या विळख्यात सामावून घेतलं. सध्या शिखा ची प्रकृती अतिशय नाजूक आहे.
View this post on Instagram
शिखा एक सर्टिफाइड नर्स आहे. अभिनय क्षेत्राबरोबरच तिने रुग्णसेवेचाही वसा घेतला आहे. मुंबईच्या जोगेश्वरीमधील हिंदू हृदयसम्राट ट्रॉमा सेंटरमध्ये ती नर्स म्हणून कोरोना रुग्णांची सेवा करत होती. सहा महिने तिने ही सेवा केली. त्यावेळीच तिला कोरोनाची लागण झाली होती.
View this post on Instagram