मुंबई – आमिर खानच्या मोस्ट अवेटेड फिल्म “लालसिंग चढ्ढा’ ची रिलीज डेट अखेर जाहीर झाली आहे. हा सिनेमा यावर्षी रिलीज होणार नसून आता हा सिनेमा पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये रिलीज होणार आहे.
निर्मात्यांनी जाहीर केल्यानुसार हा सिनेमा 14 एप्रिल 2022 रोजी रिलीज होणार आहे. शुक्रवारी गुरुनानक जयंतीच्या निमित्ताने हे पोस्टर आणि रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे आणि
बैसाखीच्या दिवशीच हा सिनेमा रिलीज होणार आहे. रिलीज डेट बरोबर रिलीज करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये आमिर खान आणि करिना कपूर रोमॅंटिक मूडमध्ये दिसत आहेत.
यापूर्वी हो दोघेही “3 इडिएट’मध्ये एकत्र दिसले होते. यापूर्वी “लालसिंग चढ्ढा’ची रिलीज डेट जाहीर करण्यात आली होती. मात्र, करोनाच्या साथीदरम्यान थिएटर बंद होती. म्हणून ही रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती.
हॉलीवूडमधील “फॉरेस्ट गम्प’चे भारतीय रूपांतरण असलेल्या “लालसिंग चढ्ढा’चे शूटिंग भारतभरात किमान 100 ठिकाणी करण्यात आले आहे. एका देशभक्त सैनिकाच्या आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यातील प्रेमकथेचे दर्शन या सिनेमात बघायला मिळणार आहे.