प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 4 -पुणे फेस्टिव्हलअंतर्गत आयोजित करण्यात आलेली “कार फिएस्टा’ या जुन्या मोटारींची “विंटेज कार’ रॅली विशेष आकर्षण ठरली. रविवारी सकाळी 9.30 वाजता रेसिडेन्सी क्लब येथून ही रॅली सुरू झाली.
पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी, मीरा कलमाडी यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवून तिची सुरुवात केली. यावेळी पूनम आणि विशाल गोखले, पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई, “महाराष्ट्र ऑटोमोटिव्ह स्पोर्टस असोसिएशन’चे अध्यक्ष आणि संयोजक श्रीकांत आपटे आदी उपस्थित होते.
ही रॅली पुणे कॅम्प, सदर्न कमांड, बंडगार्डन असा 10 कीमीचा प्रवास करून सकाळी 11.30 वाजता पुन्हा रेसिडेन्सी क्लब येथे परतली. यामध्ये योहान पूनावाला, जहीर वकील, अमूल्य आणि पंकज डहाणूकर, धनंजय बदामीकर, शंतनू देशपांडे, मुंबईचे पराग राजदा, फलटणचे रघुनाथ नाईक निंबाळकर, जयसिंह मारवाह, जोनस पवार, शिरोळे कुटुंबीय आदींच्या विंटेज कार होत्या.
बेटली (1966), मर्सिडीज (1974) मर्सिडीज (1983), फियाट (1939), फियाट (1957), फियाट (1962), वॉक्सवॅगन (1967), जीप, फोर्ड जीप (1942), प्लायमाउथ (1954), प्लायमाउथ (1955), प्लायमाउथ (1947), बेंटली, ऑस्टिन मार्टिन, ट्रीयंप सुपर सेव्हन (1930), मौरीस (1946), फरारी, पोर्श, शेवरलेट, बीएमडब्ल्यू, हिल मिन्कस (1955), रोल्स रॉयस अशा एकूण 55 विंटेज कार यामध्ये होत्या. याचे संयोजन आपटे यांनी केले. पुणे फेस्टिव्हलच्या क्रीडा स्पर्धा समन्वयक प्रसन्न गोखले हे आहे. हॉटेल रेसिडेन्सी क्लब येथे बक्षीस वितरण झाले.