नगर, (प्रतिनिधी) – तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांनी केलेल्या बदल्या रद्द करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील १५ पोलीस अधिकायांच्या अन्य जिल्ह्यांत बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर या बदल्या करण्यात आल्या आहेत. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.
पोलीस निरीक्षक विजय कर्हे यांना जिल्हा विशेष शाखेत, तर पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांना नियंत्रण कक्षात साइड पोस्टिंग देण्यात आली होती. त्यांची नाशिक ग्रामीण विभागात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नाशिक ग्रामीण विभागातून पोलीस निरीक्षक रवींद्र मगर व नंदूरबार येथील दीपक बुधवंत यांची नेमणूक करण्यात आली आहे.
याशिवाय सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांना अहमदनगर सायबर पोलिस ठाण्यात साइड पोस्टिंग देण्यात आली होती. त्यांची नाशिक ग्रामीण विभागात बदली करण्यात आली आहे. तसेच सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, रामचंद्र कर्पे, राजू लोखंडे, महेश येसकर, गणेश वारुळे यांच्या अन्य जिल्ह्यात बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यांच्या जागी नाशिक विभागातील चार सहायक पोलीस निरीक्षकांच्या नगर जिल्ह्यात नेमणुका करण्यात आल्या आहेत.
याशिवाय पोलिस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे, भरोसा सेलच्या अश्विनी मोरे, युवराज चव्हाण, योगेश चाहेर, श्रीकांत डांगे, शैलेंद्र जावळे, अमोल भारती यांची बदली नाशिक ग्रामीणला झाली असून, अन्य जिल्ह्यातून ९ पोलीस उपनिरीक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत.