पुणे – पुणे विभागात करोना बाधित संख्येने गुरूवारी (दि.3) अडीच लाखांचा (2 लाख 50 हजार 650) टप्पा पार केला आहे. तर, आतापर्यंत 1 लाख 84 हजार 382 बाधित करोनामुक्त झाले आहेत. विभागात बरे होणाऱ्यांचे प्रमाण 73.56 टक्के इतके आहे. तर, आतापर्यंत केलेल्या तपासणीतून आतापर्यंत सापडलेले बाधितांचे प्रमाण 21.2 टक्के इतके आहे. विभागात रुग्णवाढीचा वेग पुणे शहर, ग्रामीण भागात अधिक असल्याने पुण्याची स्थिती चिंताजनकच आहे.
दरम्यान, 59 हजार 596 जणांवर सध्या उपचार सुरू असून आतापर्यंत एकुण 6 हजार 672 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. विभागात मृत्यूचे प्रमाण 2.66 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्ह्यात 1 लाख 77 हजार 282 बाधित असले तरी आतापर्यंत 1 लाख 37 हजार 638 बाधित बरे होऊन घरी गेले आहेत. 35 हजार 498 बाधितांवर जिल्ह्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 4 हजार 146 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून, जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण 2.34 टक्के तर बरे होणाऱ्यांचे प्रमाण 77.64 टक्के आहे.
सातारा जिल्ह्यात 15 हजार 247 बाधित असून आतापर्यंत 8 हजार 151 बाधित बरे होऊन घरी गेले आहेत. 6 हजार 666 बाधितांवर जिल्ह्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहे. 430 जणांचा करोनामुळे मृत्यु झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यात 18 हजार 882 बाधित असून 14 हजार 242 जणांनी करोनावर मात केली आहे. 3 हजार 881 बाधितांवर जिल्ह्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहे. 769 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्ह्यात 13 हजार 897 बाधित तर 7 हजार 927 जण बरे होऊन घरी गेले आहेत. 5 हजार 428 बाधितांवर उपचार सुरू आहेत. 542 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 25 हजार 342 बाधित असून 16 हजार 424 बाधित बरे होऊन घरी गेले आहेत. 8 हजार 133 बाधितांवर उपचार सुरू आहे. 785 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.