मुंबई – बॉलिवूड इंडस्ट्रीची कोणतीही चर्चा करण जोहरशिवाय अपूर्ण आहे. करण जोहरला प्रसिद्धीच्या झोतात कसे राहायचे हे माहित आहे मग ते त्याच्या चित्रपटांबद्दल असो किंवा त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल गॉसिप असो. हा निर्माता दिग्दर्शक जितका त्याच्या चित्रपटांबद्दल जागरूक आहे तितकाच तो त्याच्या फॅशन सेन्ससाठीही ओळखला जातो. करणचा विमानतळावरील एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय.
करण जोहरचा एक व्हिडिओ समोर आला आहे, पण सध्या तो त्याच्या लूकसाठी नाही तर त्याच्या लहरीपणामुळे चर्चेत आला आहे. त्याची स्टाइल पाहून चाहत्यांनी त्याला चांगलाच सुनावलं आहे. विमानतळावर घाई घाईत निघालेल्या करणचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.
करण जोहर विमानतळावर पोहोचताच गेटमधून आत शिरू लागला. यावेळी त्याला सुरक्षारक्षकांनी थांबवून कागदपत्रे दाखवण्यास सांगितले. यानंतर करण जोहरलाही बॅगेतून कागदपत्रे काढायला वेळ लागला. मग काय, नेटिझन्सनी करणला नियमांचे महत्व सांगायला सुरुवात केली.
सोशल मीडिया युजर्सनी करण जोहरचा त्याच्या या वागणुकीवर क्लास घेतला आहे. एकाने लिहिले, “याला कोणीतरी नियम समजून सांगा, हा चित्रपटाचा सेट नाही’ तर दुसऱ्या एकाने हॅट्स ऑफ दॅट सेक्युरिटी ऑफिसर’ अशी कमेंट केली आहे.
View this post on Instagram
बॉलिवूडला ‘कुछ कुछ होता है’ आणि ‘ए दिल है मुश्किल’ सारखे चित्रपट देणाऱ्या करण जोहरचा पुढचा चित्रपट म्हणजे ‘रॉकी आणि रानी की प्रेम कहानी. हा चित्रपट यावर्षी 28 जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. आलिया भट्ट आणि रणवीर सिंग या चित्रपटाची मुख्य स्टारकास्ट आहे.