दिशा परिवार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे राज्यातील गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीच्या माध्यमातून शिष्यवृत्ती प्रदान समारंभ घोले रत्यावरील पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे आज उत्साहात पार पडला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ‘नाफेड’चे अतिरिक्तसंचालक सुनीलकुमार सिंग, आमदार रवींद्र धंगेकर, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ भाऊसाहेब जाधव, दै. प्रभातचे सरव्यवस्थापक बी. एल. स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी दिशा परिवारचे अध्यक्ष माणिकराव गोते, तसेच महेंद्र खंडेलवाल, अरुण कुलकर्णी, विवेक अगरवाल, पौर्णिमा जानोरकर, नंदकिशोर रोजेकर, राजाभाऊ चव्हाण, कल्पना चव्हाण आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.