मुंबई – महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्या लागणार आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेचा निकाल उद्या होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सुनावणीदरम्यान या निकालासंदर्भात टिपण्णी केली आहे. 20 जून 2022 रोजी महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणुकीनंतर जे नाट्य रंगलं, त्यातून सत्तांतरापर्यंत आणि शिवसेनेच्या फुटीपर्यंत घडामोडी घडल्या. तेव्हापासून हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आले. 14 फेब्रुवारी ते 16 मार्च सलग सुनावणी झाली. आणि तेव्हापासून हा निकाल राखीव आहे. याबाबत आता उद्या निकाल होण्याची दाट शक्यता आहे. उद्याच्या निकालानंतर आता राज्यातील सरकार राहणार की कोसळणार याची उत्कंठा सर्वांना लागलेली आहे.
#BREAKING Supreme Court Constitution Bench to deliver the judgment in ShivSena case tomorrow, says CJI DY Chandrachud.
“We have two Constitution Bench judgments to deliver tomorrow”, says CJI DY Chandrachud. #SupremeCourtofIndia pic.twitter.com/7wTJyinVAC
— Live Law (@LiveLawIndia) May 10, 2023
ते 16 आमदार कोण?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मतदारसंघ – कोपरी पाचपाखाडी, ठाणे), अब्दुल सत्तार (सिल्लोड, छ. संभाजीनगर), संदीपान भुमरे (पैठण), संजय सिरसाठ (छ. संभाजीनगर पश्चिम), तानाजी सावंत (भूम, परंडा धाराशीव), यामिनी जाधव (भायखळा, मुंबई), चिमणराव पाटील (भायखळा मुंबई), भरत गोगावले (महाड), लता सोनवणे (चोपडा, जळगाव), प्रकाश सुर्वे (मागाठाणे, मुंबई), बालाजी किणीकर (अंबरनाथ, ठाणे), अनिल बाबर (खानापूर, सांगली), महेश शिंदे (कोरेगाव, सातारा), संजय राममुलकर (बुलढाणा), रमेश बोरणारे (वैजापूर, छ. संभाजीनगर), बालाजी कल्याणकर (नांदेड उत्तर) यांच्या अपात्रतेबाबत उद्या सर्वोच्च न्यायालयात निकाल होणार आहे.