शिक्रापूर – नगर-पुणे रस्त्यावर शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पाबळ चौकात नगर बाजूने पुण्याकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेत एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत व्यक्तीचे वर्णन पुढीलप्रमाणे- वय अंदाजे 35 ते 40 वर्षे, अंगात निळसर रंगाचा शर्ट, काळी पॅंट, डाव्या हाताच्या दंडावर माया, पोटरीवर मीराबाई, उजव्या हातावर जय भीम असे नाव गोंदलेले आहे. संबंधित वर्णनाच्या व्यक्तीबाबत काही माहिती असल्यास शिक्रापूर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.