सेवा क्षेत्राची उत्पादकता सहा महिन्यांच्या नीचांकावर

नवी दिल्ली – गेल्या आठवड्यात मॅन्युफॅक्‍चरिंग क्षेत्राची उत्पादकता कमी झाल्याची आकडेवारी जाहीर झाली होती.आज सेवा क्षेत्राची उत्पादकता कमी होऊन सहा महिन्यांच्या नीचांकावर गेल्याची आकडेवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे अर्थ आणि उद्योग क्षेत्रात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

गुरुवारी निक्केई इंडिया सर्व्हिसेस बिझनेस ऍक्‍टिविटी निर्देशांक जाहीर करण्यात आला. मार्च महिन्यात हा निर्देशांक कमी होऊन 52 एवढा नोंदला गेला आहे जो की फेब्रुवारी महिन्यात 52.5 इतका होता. सप्टेंबरनंतर प्रथमच हा निर्देशांक 52 इतका झाला आहे. मात्र तरीही हे क्षेत्र वाढण्याची शक्‍यता खुली आहे. कारण हा निर्देशांक 50 च्यावर असल्यानंतर वाढीची शक्‍यता खुली असते असे आयएचएस मार्केट यासह संस्थेच्या मुख्य अर्थतज्ज्ञ पॉलीना डिलीमा यांनी सांगितले. अहवाल करताना सेवा क्षेत्रातील मुख्य अधिकारी व पर्चेसिंग अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.