दयाबेनला रिप्लेस करायचेय

“तारक मेहता का उल्टा चष्मा’ गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. या सिरीयलच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. बऱ्याच दिवसांपासून दिशा वाकनी अर्थात “तारक…’मधील दयाबेन सीरियलमध्ये पुन्हा येणार असे बोलले जात होते. मात्र आता निर्मात्यांनी तिची वाट बघायचे सोडून द्यायचे ठरवले आहे. इतके दिवस ती परत येईल, या एक आशेवर दयाबेनच्या रोलसाठी दुसऱ्या हिरोईनला निवडले गेले नव्हते. पण आता दयाबेनच्या रोलसाठी रिप्लेसमेंट शोधली जाणार आहे, हे नक्की झाले आहे.

निर्माते आसित मोदीने एका प्रेस कॉन्फरन्समध्ये आपण दयाबेनच्या रोलसाठी रिप्लेसमेंट शोधणार असल्याचे स्पष्ट केले. कोणताही कलाकार शो पेक्षा मोठा असू शकत नाही. “तारक मेहता का उल्टा चष्मा’पण नवीन कलाकारांबरोबर पुढे सरकेल. कारण दयाबेनशिवाय गाढा फॅमिली अर्धवट असेल. त्यामुळे आता दयाबेनला रिप्लेसमेंट शोधण्याची वेळ आली आहे, असे असित मोदींनी सांगितले.

भारतात काम करणाऱ्या महिला जेंव्हा प्रेग्नंट होतात तेंव्हा त्यांना मॅटर्निटी ब्रेक द्यावा लागतो. मूल जन्मल्यानंतर काही दिवसांनी त्या पुन्हा आपल्या कामावर रुजू होतात. त्याच प्रमाणे दिशालाही सुटी दिली. पण आता आणखी वाट बघितली जाऊ शकत नाही. एखाद्या लीड ऍक्‍ट्रेसला रातोरात रिप्लेस केले जाऊ शकत नाही. एक महिन्याचा ऍडव्हान्स स्टोरी ट्रॅक तयार करावा लागतो. आता दयाबेनच्या रोलसाठी ऑडिशनला सुरुवात केली तर महिन्याभरात रिप्लेस हिरोईन स्क्रीनवर येऊ शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दिशा वाकानी सप्टेंबर 2017 पासून मॅटर्निटी लीव्हवर आहे. तेंव्हापासून “तारक…’च्या प्रेक्षकांना दयाबेनच्या रोलमध्ये दिशा दिसलीच नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.