रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट लार्ज शॉर्ट फिल्म्सच्या “रोगन जोश’ या लघुपटाला 64व्या फिल्मफेअर ऍवॉर्डमध्ये सर्वोत्कृष्ट लघुपटाचा (फिक्शन) पुरस्कार मिळाला आहे. नसरुद्दिन शहा यांची प्रमुख भूमिका असलेल्या या लघुपटात 26/11च्या काळरात्रीचा एक विदारक अनुभव दाखवण्यात आला आहे. रोगन जोश ही मुंबईतील ताज हॉटेलातील एका प्रसिद्ध शेफची गोष्ट आहे. तो त्याच्या वाढदिवसानिमित्त मित्र आणि कुटुंबीयांसमवेत डिनरला जातो आणि काय घडते, याची ही कथा आहे.
26/11च्या दहशतवादी हल्ल्यात आपल्या प्रियजनांना गमावलेल्यांना हा लघुपट समर्पित करण्यात आला आहे. या पुरस्काराबद्दल संजीव विग म्हणाले, “फिल्मफेअर पुरस्कार मिळणे, ही अभिमानाची बाब आहे, त्यातही तुमच्या पहिल्या लघुपटासाठी म्हणजे दुग्धशर्करा योग! मी एंडेमोल शाइन इंडिया, रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट लार्ज शॉर्ट फिल्मचा आभारी आहे.’ नसरुद्दिन शहा यांनी सर्व टीमचे कौतुक केले आहे.
फिल्मफेअरच्या अन्य पुरस्कारविजेत्यांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री-कृती कुल्हारी, सर्वोत्कृष्ठ अभिनेता हुसैन दलाल, सर्वोत्कृष्ट नॉन फिक्शन फिम्लम “द सॉकर सिटी’. सर्वोत्कृष्ट फिल्म – पॉप्युलर चॉईस- “प्लस मायनस’ला गौरवण्यात आले.