नवी दिल्ली – देशातील कोविड रूग्णांच्या संख्येत सध्या सातत्याने घट होताना दिसत असून देशात गेल्या 24 तासांत कोविडचे 29 हजार 616 रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील आत्तापर्यंतची एकूण रूग्ण संख्या 3 कोटी 36 लाख 24 हजार 419 इतकी झाली आहे.
काल दिवसभरात कोविड मुळे 290 रूग्ण दगावले असून त्यामुळे मृतांची एकूण संख्या 4 लाख 46 हजार 658 इतकी झाली आहे. देशातील सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.90 टक्के इतके झाले आहे. तर रिकव्हरी रेट 97.78 टक्क्यांवर गेला आहे.
दैनंदिन पॉझिटीव्हीटी रेट 1.86 टक्क्यांवर गेला आहे. दरम्यान देशातील 84.89 कोटी लोकांना कोविडची लस आत्तापर्यंत देऊन झाली आहे.