कराड (प्रतिनिधी) – येथील सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील करोनाबाधित रुग्णाच्या निकट सहवासातील म्हणून दाखल करण्यात आलेल्या वनवासमाची येथील एका व मलकापूर येथील दोन अशा तीन रूग्णांचे अहवाल करोनाबाधित असल्याचे सोमवारी निष्पन्न झाले. त्यामुळे कराड तालुक्यातील करोनाबाधितांची मंदावलेली साखळी सोमवारी पुन्हा सुरू झाली.
वनवासमाची येथील बाधित रूग्णाच्या निकट सहवासातील वनवासमाची येथील 56 वर्षीय पुरूष, मलकापूर येथील 15 वर्षीय मुलगा व 30 वर्षीय महिलेचा यात समावेश आहे. या पार्श्वभूमीवर मलकापूर नगरपालिकेने शहरातील निर्बंध अधिकच कडक केले आहेत.