मुंबई – नुकतंच ‘द नाईट मॅनेजर 2’ चा ट्रेलर रिलीज झाला असून, सोशल मीडियावर एकच खळबळ निर्माण झाली आहे. ‘द नाईट मॅनेजर 2’ च्या ट्रेलरमध्ये अनिल कपूर, आदित्य रॉय कपूर आणि शोभिता धुलिपाला यांची मुख्य भूमिका आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला आदित्य रॉय कपूर शॉनची भूमिका साकारत आहे, तो रावणाच्या लंकेला आग लावण्याच्या म्हणजेच शेलीचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याच्या तयारीत आहे. शेली आणि शॉन नंतर एकत्र दाखवले जातात, जे खूपच आश्चर्यकारक आहे.
‘द नाईट मॅनेजर पार्ट 2’ च्या अधिकृत ट्रेलरमध्ये, माजी गुप्तचर अधिकारी शॉन सेनगुप्ता या मालिकेतील खलनायक म्हणजेच शैलेंद्र रुंगटा विरुद्ध काहीतरी योजना आखत आहे. ज्यात बरेच सस्पेन्स आणि ड्रामा आणणार आहे. नाईट मॅनेजर झाल्यानंतर शॉन शैलेंद्रला भेटतो आणि नंतर त्याच्या टीमचा एक भाग बनतो असे ट्रेलरमध्ये दिसून येते.
शैलेंद्रचा विश्वास जिंकल्यानंतर शॉन शैलेंद्रला तोडण्यासाठी काहीतरी करतो. ‘द नाईट मॅनेजर’च्या ट्रेलरमध्ये अनिल कपूर म्हणजेच शैलेंद्रचे उग्र रूपही पाहायला मिळते. ‘नाईट मॅनेजर 2’ चा ट्रेलर सोशल मीडियावर चांगलाच पसंत केला जात आहे. 5 जून रोजी Disney Hotstar च्या सोशल मीडियावर रिलीज झाला आहे.
सस्पेन्स आणि अॅक्शनने भरलेल्या या शोचा दुसरा भाग 30 जून रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. द नाईट मॅनेजरमध्ये अनिल कपूरसोबत आदित्य रॉय कपूर, शोभिता धुलिपाला, तिलोत्तमा शोम, रवी बहल आणि सास्वता चॅटर्जी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ‘द नाईट मॅनेजर’चा भाग एक फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित झाला होता, ज्याला प्रेक्षकांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला होता.