मुंबई- नव्या सार्वभौम सुवर्ण रोख्याअंतर्गत उपलब्ध असलेले राखे ग्राहकांना 29 नोव्हेंबर पासून मिळण्यास सुरुवात झाली असून ग्राहकांना 3 डिसेंबरपर्यंत हे रोखे खरेदी करता येणार आहेत. या रोख्यातील सोन्याचा दर प्रति गॅमसाठी 4,791 रुपये ठरविण्यात आला आहे.
जे ग्राहक रोखण्यासाठी ऑनलाईन मागणी करतील आणि डिजिटल पेमेंट करतील त्यांना प्रत्येक ग्रॅम वर 50 रुपयांची सूट जाहीर करण्यात आली आहे. काही बॅंका, काही पोस्टाची कार्यालये आणि शेअर बाजाराच्या माध्यमातून हे रोखे खरेदी करता येऊ शकणार आहेत. ग्राहकांनी प्रत्यक्ष सोने खरेदी करण्याऐवजी रोख्याच्या माध्यमातून सोने खरेदी करावे यासाठी नोव्हेंबर 2015 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली आहे.
एक ग्रॅमच्या प्रमाणात हे राखे उपलब्ध असून रोख्यचा कालावधी आठ वर्ष आहे. पाच वर्षानंतर या रोख्यातून बाहेर पडता येते. किमान एक गॅमपासून 5 किलोपर्यंतचे रोखे व्यक्ती किंवा हिंदू अविभक्त कुटुंब खरेदी करू शकते. ट्रस्ट किंवा इतर संस्थांना 20 किलोपर्यंतचे रोखे खरेदी करता येतात. प्रत्यक्ष सोने खरेदी करताना जी केवायसी लागू होते तशीच केवायसी राखे खरेदी करताना लागू होते.
……..