मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नेहमी त्यांच्या भाषणामुळे चर्चेत असतातच पण त्यांची दुसरी चर्चा होते ती त्यांच्या चाहत्यांमुळे. राज ठाकरे यांचे सर्व वयोगटातील चाहते आहेत. आज राज ठाकरेंची तीन वर्षाची चाहती ‘रुद्राणी’ थेट त्यांना भेटण्यासाठी पोहचली. आणि या गोंडस भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.
“एका चिमुरडीला राज ठाकरे यांना भेटण्याची आर्त इच्छा होती. तसा तिने आपल्या बाबांकडे हट्टच धरला होता आणि जेव्हा त्या निरागस चिमुकलीने राजसाहेबांची भेट घेतली तेव्हा राजसाहेबांनी विचारलं, तुला मला का भेटायचं होतं? त्यावर या चिमुकलीने निशब्द असं गोंडस उत्तर दिलं:,असे मनसेनेच्या फेसबुक पेजवर म्हटले आहे.
राज ठाकरे यांची भेट घेणारी चिमुकली मनसेचे कार्यकर्ते प्रफुल्ल पाटील यांची मुलगी असून तिचे नाव नाव ‘रुद्राणी’ आहे. ती तीन वर्षांची आहे. तिला राज ठाकरे यांना भेटण्याची प्रचंड इच्छा असल्यामुळे ती सतत आपल्या बाबांकडे हट्ट करायचे. आणि आज तिचे हट्ट पूर्ण झाले.