नवी दिल्ली – कराचीच्या रस्त्यावर दिवसा ढवळ्या एक सिंह मुक्त संचार करत असल्याचे दृश्य आज नागरिकांनी बघितले. कोणत्याही बंधनाशिवाय रस्त्याच्या गल्ली बोळातून हा सिंह हिंडत असल्याचे बघून कराचीचे नागरिक भयचकीत झाले. या सिंहाचा रस्त्यावरून हिंडत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
हा सिंह कराचीतील शरेसा फैसल रस्त्यावरून हिंडत होता. आजूबाजूला लोक आणि वाहने हिंडत असल्याचेही या व्हिडीओमध्ये दिसते आहे. मोकाट सुटलेला सिंह एका इमारतीच्या पार्किंगमध्ये घुसला. त्यानंतर पोलिसांना या सिंहाबद्दल कळवण्यात आले. लोकांनी घराबाहेर पडू नये आणि या सिंहाच्या आजूबाजूला जाऊ नये, अशी सूचना नागरिकांना केली गेली.
प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी या सिंहाला कसे तरी पिंजऱ्यामध्ये पकडले आणि त्याची सुखरुप योग्य ठिकाणी रवानगी करण्यात आली. हा सिंह 2 वर्षे वयाचा असल्याचे वन्यजीव विभागाच्या उपवनसंरक्षक मुमताज सूमरो,यांनी सांगितले. सुदैवाने या सिंहाने कोणावरही हल्ला केल्याचे वृत्त नाही. मात्र भयभीत झालेल्या नागरिकांची भीतीने गाळण मात्र उडाली होती.
A lion was caught on camera walking down Shahrah-e-Faisal, the main artery of the city, on Tuesday evening.
The pedestrians and car passengers passing by were caught in surprise witnessing a wild life animal roaming around the busiest roads of Karachi. #etribune #Karachi… pic.twitter.com/dcHDS1SOOI
— The Express Tribune (@etribune) August 29, 2023
हा सिंह एका पशू खात्याच्या वाहनातून दुसरीकडे नेला जात असताना पळून गेला होता. चालकाने याबाबत पोलिसांना कळवले होते. या चालकालाही नंतर ताब्यात घेण्यात आले. वन विभाग आणि वन्य पशू विबागाशी संपर्क केला जात असल्याचे पोलिसांनी नंतर सांगितले.