जिनिव्हा – दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या नवीन उत्परिवर्तित करोना विषाणूला जागतिक आरोग्य संघटनेकडून “ओमिक्रोन’ असे नाव देण्यात आले आहे. हे नाव ग्रीक अक्षरांवरून देण्यात आले आहे. मात्र हे नाव देण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने एक अक्षर वगळून “ओमिक्रोन’ हे अक्षर निवडले आहे.
प्रत्यक्षात अक्षर निवडताना “शी’ (Xi) हे अक्षर येत होते. हा नवीन विषाणू सापडल्याची बातमी चर्चेत येऊ लागल्यावर त्याचे नाव “नू’ (Nu) असे असणार अशी चर्चा सुरू झाली होती. सोशल मीडियावर त्याबद्दलचे संभाव्य अंदाज व्यक्त व्हायला लागले होते.
करोनाच्या आतापर्यंत सापडलेल्या सर्व विषाणूंमध्ये हा नवीन विषाणू अधिक घातक समजला जात असल्यामुळे त्याचे नामकरण कोणत्या अक्षराने होणार याबद्दल चर्चा होणे स्वाबाविक होते. ग्रीक वर्णमालेनुसार अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा, एप्सिलॉन, झिटा, ईटा, थिटा, आयोटा, कप्पा, लॅमडा, मू, नू आणि त्यानंतर शी हे अक्षर येते. नू नंतर ओमिक्रोनचा क्रमांक लागतो. मात्र जातिक आरोग्य संघटनेच्या तज्ञांनी जाणीवपूर्वक नू आणि शी ही दोन्ही अक्षरे वगळली आणि ओमिक्रोन हे अक्षर निवडले.
नू हे अक्षर न निवडण्याचे कारण म्हणजे याच्या उच्चारामुळे इंग्रजी “न्यू’च्या उच्चाराचा भास होऊ शकतो. तर त्यापाठोपाठ येणाऱ्या “शी’चे स्पेलिंग Xi सारखा असल्यामुळे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या नावाशी साधर्म्य साधले जाऊ शकले असते. हे दोन्ही संभाव्य धोके टाळण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने जाणीवपूर्वक ही दोन्ही अक्षरे वगळून ओमिक्रोनची निवड केली आहे, अस “डब्लूएचओ’च्या सूत्रांनी म्हटले आहे.