वाघोली -विकासकामांचा आलेख नेहमी उंचावणारा असावा. त्यातून लोकाभिमुख निर्णयाची व परिसर विकासाची नवी चाहूल उदयास येत असल्याचे प्रतिपादन माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील यांनी केले.
वाघोली येथील वॉर्ड क्रमांक 2 मधील रोझ गार्डन सोसायटी अंतर्गत ड्रेनेज लाइन, पिण्याच्या पाण्याची लाइन व रस्ता कॉंक्रिटीकरण (1 कोटी 10 लाख रुपये) कामाचे भूमिपूजन राजेंद्र सातव पाटील यांच्या हस्ते व वाघोली गावच्या सरपंच वसुंधरा शिवदास उबाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास दाभाडे, माजी जिल्हा परिषदेच्या सदस्या अर्चना शांताराम कटके, माजी सरपंच शिवदास उबाळे, माजी उपसरपंच कैलास सातव, वाघोली ग्रामपंचायत सदस्य सुधीर भाडळे, महेंद्र भाडळे, जयप्रकाश सातव पाटील, ग्रामपंचायत सदस्या वंदना दाभाडे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब सातव, रोझ गार्डन सोसायटीमधील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.