म्हसवड, (प्रतिनिधी) – विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता, त्यांच्यातील कौशल्यांचा विकास करून, सुसंस्कृत बनवण्याचे अहिल्या शिक्षण संस्थेचे कार्य आदर्शवत असल्याचे मत मुंबई महापालिकीचे माजी मुख्य अभियंता शहाजीराव सवदे यांनी व्यक्त केले.
सांगली येथील महाराणीदेवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटीच्या संचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचा 64 व्या वार्षिक स्नेहमेळावा म्हसवड, ता. माण येथील ज्ञानवर्धिनी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये नुकताच झाला. त्यावेळी ते बोलत होते. संस्थेचे चेअरमन आर. एस. चोपडे अध्यक्षस्थानी होते.
राज्य शिक्षणसंस्था महामंडळाचे संचालक प्रा. एन. डी. बिरनाळे, जीवन विद्या मिशनचे विश्वस्त संतोष तोत्रे, संस्थेचे सल्लागार एम. एम. वाघमोडे, एस. के. कदम, एन. ए. यादव, व्हाइस चेअरमन श्रीमती एल. टी. शेंडगे, सचिव एस. ए. पाटील, समन्वय समितीचे अध्यक्ष डी. ए. वाघमोडे, कार्यवाह बी. पी. सरगर, सहकार्यवाह प्रशांत स्वामी, डॉ. मानसी सोनलकर, एस. डी. वाघमोडे, माजी नगरसेवक ईश्वरा खोत उपस्थित होते.
या कार्यक्रमांत बी. पी. सरगर, श्रीरंग रणखांबे यांना अहिल्या भूषण पुरस्कार, सौ. व्ही. यू. नलवडे, आनंदराव फडतरे यांना उपक्रमशील शिक्षक, स्वच्छ सुंदर व उपक्रमशील शाळांमध्ये उच्च माध्यमिक विभाग झरे विद्यालय (प्रथम), खुडूस व तिसंगी शाळा (विभागून द्वितीय), माध्यमिक विभागात विरळी शाळा (प्रथम), रेवनाळ शाळा (द्वितीय), अंशत: अनुदानित गटात डोर्ली शाळा (प्रथम), धुळदेव शाळा (द्वितीय), प्राथमिक गटात किडस् पॅराडाइज, सांगली (प्रथम), झरे व तिसंगी शाळा (विभागून द्वितीय), वसतिगृह गटात झरे (प्रथम), अंकले (द्तिीय) आणि संस्थेत प्रथम येणार्या विद्यार्थ्यांना आणि विषय सरासरीत प्रथम येणार्या शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. माजी प्राचार्या चंदा माने यांच्या ‘मागे वळून पाहताना’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांना आर्थिक साहाय्यासाठी एक लाख रुपयांचा धनादेश शहाजीराव सवदे यांनी चोपडे यांच्याकडे सुपुर्द केला. दुसर्या सत्रापूर्वी सांस्कृतिक कार्यक्रम झाला. यामध्ये ‘नावाची गोजिरी’, ‘अरेबिक साँग’ म्हसवडच्या विद्यार्थ्यांनी, तर राजा शिवछत्रपती ही नाटिका झरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केली. आर. एस. चोपडे यांनी प्रास्ताविक केले. सौ. संध्या वीरकर व एस. सी. सावंत यांनी सूत्रसंचालन केले. एस. ए. पाटील व प्रशांत स्वामी यांनी आभार मानले.