इस्लामाबाद – पाकिस्तानात करोनाची रुग्ण संख्या सुमारे तिपटीने वाढली असून, ही करोनाच्या चौथ्या लाटेची लक्षणे आहेत, असे तेथे मानले जात आहे. तीन आठवड्यांच्या अवधीनंतर पुन्हा तेथे करोनाने डोके वर काढले आहे.
या आधीची लाट ओसरल्यानंतर पाकिस्तानातील बहुतांशी व्यवहार सुरळीतपणे सुरू करण्यात आले होते. त्यामुळे ठिकठिकाणी गर्दी झाली तसेच पर्यटनासाठीही लोकांनी मोठी गर्दी केली होती. त्याचेच दुष्परिणाम लोकांना भागावे लागत आहेत, असे तेथील एका सरकारी अधिकाऱ्याने म्हटले आहे.
देशात गेल्या 24 तासांत करोनाचे एकूण 1980 रुग्ण आढळून आले असून, पॉझिटिव्हिटीचा तेथील दर आता 4.09 टक्के इतका झाला आहे. मे 30 नंतर प्रथमच पॉझिटिव्हिटी रेट चार टक्क्यांच्यावर गेला आहे.