बेल्हे -जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये उन्हाळी भुईमूगाची पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील राजुरी, बोरी बुद्रुक, साळवाडी, शिरोली, सुलतानपूर, भोरवाडी, वडगाव कांदळी, जाधववाडी, तांबेवाडी, साकोरी, मंगरूळ या गावांमध्ये सध्या उन्हाळ्याच्या हंगामातील येणारे भुईमूग या पिकांची पेरणी करण्यासाठी व्यस्त असताना दिसून येत आहे.
विशेषतः जवळपास या परिसरातील बहुतेक शेतकरी हा पारंपरिक पद्धतीने म्हणजे बैलांनी शेतीची मशागत तसेच पेरणी करताना दिसून येत आहे.