सेंट हेलियर (जर्सी, ब्रिटन)– ब्रिटनच्या जर्सी बेटावर गॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटामुळे किमान तिघांचा मृत्यू झाला आहे. तर डझनभर लोक बेपत्ता झाले आहेत. जर्सीच्या चॅनेल बेटावर शनिवारी ही दुर्घटना घडली. जर्सीचे मुख्यमंत्री क्रिस्टिना मूर यांनी ही माहिती दिली आहे. स्थानिक प्रमाणवेळेनुसार पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला, असे पोलिसांनी सांगितले.
या स्फोटामुळे लागलेली आग आटोक्यात आणण्यात आली आहे आणि इमर्जन्सी युनिटला सक्रिय करण्यात आले आहे, असे जर्सी पोलिसांच्या मुख्य अधिकाऱ्यांनी सांगितले.
या स्फोटामुळे तीन मजली एक इमारत पूर्णपणे जमिनदोस्त झाली असून इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकले असल्याची शक्यताही या अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे.
या इमारतीच्या शेजारच्या इमारतीतील काही फ्लॅट सुरक्षिततेच्या कारणास्तव रिकामे करण्यात आले आहेत. तेथील 20 ते 30 रहिवाशाना जवळच्या शिबिरामध्ये तात्पुरत्या मुक्कामाला नेण्यात आले आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
Canada : सरकारी कामकाजामध्ये ‘सिंधी’ भाषेच्या वापराला मंजुरी द्यावी, कॅनडाच्या संसदेमध्ये मागणी
जर्सी हा प्रांत फ्रान्सच्या उत्तरेकडील सीमेलगतचे बेट आहे. हा स्फोट होण्यामागील कारणांचा शोध तपास केला जात आहे.