VIRAL VIDEO : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ खूप कॉमेडी आहेत म्हणून व्हायरल होतात तर काही अनेकजण शेअर करतात म्हणून व्हायरल होतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. ज्यामुळे लहान मुलांची काळजी घेणं किती गरजेचं आहे याचा प्रत्यय प्रत्येकांना येताना दिसत आहे.
लहान मुलं घरात असो वा घराबाहेर त्यांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. नाहीतर कोणत्याही कठीण प्रसंगांचा सामना पालकांना करावा लागू शकतो. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दोन लहान मुलं घराजवळ खेळता खेळता घर शेजारी असलेल्या साचलेल्या गटारीजवळ येतात. पाणी जास्त खोल नाही असं समजून त्यातील एक मुलगा त्या गटारीत उतरतो आणि पोहता येत नसल्यामुळे गटांगळ्या खाऊ लागतो.
गटारीत पडलेल्या त्या चिमुकल्यासोबत असलेली मुलगी मदतीसाठी इकडे तिकडे फिरते आणि मदत मागण्याचा प्रयत्न करते. तोपर्यंत पडलेला मुलगा जिवाच्या आकांताने हातपाय हलवताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. हे पाहून एक व्यक्ती त्वरित त्या घाण पाण्यात उतरते आणि मुलाला सुखरूप बाहेर काढते. मुलगा व्यवस्थित पणे बाहेर येताच सुटकेचा निश्वास टाकतो.
View this post on Instagram
व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कधीचा आणि कोणत्या शहरातील आहे हे जरी समजत नसले तरी यावरून अनेकांनी आपल्या मुलांची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. घराजवळ अशी गटारी कोण करत ? व्हिडीओ कुठला आहे ? असे अनेक प्रश्न यावेळी नेटकऱ्यांनी उपस्थित केलं आहेत. मात्र अनेकांनी मुलांची काळजी घेण्याचा सल्ला यावेळी दिला आहे.