Kumar Kushagra Delhi Capitals IPL 2024 : इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या लिलावात अनेक खेळाडूंना अपेक्षेपेक्षा जास्त किंमत मिळाली आहे. या लिलावात परदेशी खेळाडूंसह देशी खेळाडूंनाही मोठी रक्कम मिळाली. दिल्ली कॅपिटल्सने 19 वर्षीय अनकॅप्ड भारतीय खेळाडूवर 7.20 कोटी रुपये खर्च केले आहेत. दिल्लीने कुमार कुशाग्रला मूळ किमतीपेक्षा कितीतरी जास्त पैसे देऊन विकत घेतले आहे.
Dilliwalon, Kumar Kushagra is now a DC player 🙌
He signs for INR 7.2 crores 🥳#IPLAuction #YehHaiNayiDilli
— Delhi Capitals (@DelhiCapitals) December 19, 2023
कुमार कुशाग्रची मूळ किंमत 20 लाख रुपये होती. चेन्नई सुपर किंग्जने त्याच्यावर पहिली बोली लावली. यानंतर गुजरात टायटन्सने प्रवेश केला. गुजरात आणि चेन्नई यांच्यात थोडक्यात लढत झाली. चेन्नईने 60 लाखांची शेवटची बोली लावली. यानंतर दिल्ली कॅपिटल्सने बोली लावण्यास सुरुवात केली. दिल्ली आणि गुजरात यांच्यातील लढत शेवटपर्यंत सुरू राहिली. गुजरातने 7 कोटी रुपयांपर्यंत बोली लावली. पण शेवटी दिल्ली जिंकली. दिल्लीने त्याला 7.20 कोटी रुपयांना खरेदी केले.
कुशाग्राने अंडर-19 टीम इंडियासाठी चांगली कामगिरी केली आहे. तो झारखंडकडून देशांतर्गत सामन्यांमध्ये खेळतो. झारखंडचा यष्टिरक्षक फलंदाज कुमार कुशाग्रने नुकत्याच झालेल्या विजय हजारे ट्रॉफी सामन्यात 37 चेंडूत नाबाद 67 धावा खेळून आपल्या संघाला महाराष्ट्राविरुद्ध अशक्यप्राय विजय मिळवून दिला. कुशाग्र सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला तेव्हा संघाला 12.1 षटकात 104 धावांची गरज होती. त्याने कर्णधार सौरभ तिवारीसह तीन चौकार आणि पाच षटकारांसह अविश्वसनीय खेळी खेळली. जेव्हा कुशाग्र मैदानावर षटकार मारत होता, तेव्हा अनेक आयपीएल संघांचे स्काउट तेथे उपस्थित होते आणि ते त्याच्या निर्भीड खेळीने प्रभावित झाले होते.
इशान किशनच्या अनुपस्थितीत, कुशाग्रा कालांतराने झारखंडचा मुख्य यष्टिरक्षक बनला आहे. झारखंडसाठी त्याने अनेक तुफानी खेळी खेळल्या आहेत. इशान आपला जास्तीत जास्त वेळ राष्ट्रीय संघासोबत घालवतो. दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स दोन्ही सक्षम भारतीय यष्टीरक्षक शोधत असताना, कुशाग्राला मोठी बोली मिळेल याची खात्री होती. लिलावातही असाच प्रकार घडला.
मात्र, कुशाग्रला ही रक्कम नशीबानं मिळाली नाही. यासाठी त्याने अनेक वर्षे कठोर परिश्रम घेतले आणि देशांतर्गत स्तरावर अनेक वेळा स्वत:ला सिद्ध केले. तो धोनीसारखा यष्टिरक्षक फलंदाज आहे आणि त्याच्याप्रमाणे शेवटच्या षटकांत स्फोटक फलंदाजी करण्यात पटाईत आहे. दिल्ली संघाला एका चांगल्या मॅच फिनिशरची गरज होती. त्यामुळेच दिल्लीसाठी लिलावाच्या टेबलावर बसलेल्या ऋषभ पंतने त्याच्यावर एवढी मोठी रक्कम खर्च केली आहे.