मुंबई – प्रसिद्धीसाठी आणि प्रमोशनसाठी अनेकदा सेलिब्रेटी रस्त्यावर उतरलेले आपण पाहतो. हटके अंदाजात सर्वसामान्यांमध्ये फिरण्यापासून ते ऍक्शन स्टंट करण्यापर्यंत सेलिब्रेटी प्रमोशनसाठी मोठं मोठ्या जोखीम पत्करतात. काइली जेनर एक अशी अभिनेत्री आहे जिच्या परिचयाची गरज नाही. काइलीने सध्या आपल्या लूकने कहर केला आहे.
हॉलीवूडसह अनेक देशांमध्ये प्रसिद्ध असलेल्या काइलीने लिपस्टिक ब्रँडच्या प्रमोशनसाठी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. लिपस्टिकचा प्रमोशनसाठी काइलीने असे फोटोशूट केले आहे. ज्यात तिने कोणताही शर्ट किंवा टॉप घातलेला नाही. केवळ लिपस्टिक ;लावून काइलीने हे फोटोशूट केलं आहे. या फोटोमुळे ब्रॅण्डची बॅब्लिसिटी तर होतच आहे शिवाय काइलीची जोरदार चर्चा सुरु आहे.
या फोटोमध्ये काइलीचे केस बांधलेले असून हलक्या मेकअपमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. इतकं सगळं असूनही सर्वांचं लक्ष कायलीच्या ‘कपड्यां’कडे आहे. काइली जेनरच्या या लूकने इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. टॉप किंवा शर्ट न घातला काइलीने लिप्स्टीकचाच एक संच परिधान केल्याने ब्रॅण्डची चांगलीच चर्चा सुरु आहे.