राज्यात आचारसंहिता भंगाच्या १८६ तक्रारी दाखल गृह विभागाने राज्य निवडणूक आयोगाला आचारसंहितेच्या काळात दाखल गुन्हे, जप्त करण्यात आलेली दारू, रक्कम आदींबाबतचा अहवाल पाठविला आहे. त्यानुसार महापालिका निवडणुकीत आचारसंहितेचा भंग केल्याच्या १८६ तक्रारी राज्यभरात करण्यात आल्या आहेत. आचारसंहितेच्या काळात ८.३२ कोटी रुपये वेगवेगळ्या ठिकाणी जप्त करण्यात आले. निवडणुकीशी संबंधित ३८ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. याशिवाय ५ कोटी ९५ लाख रुपये किंमतीची दारू जप्त करण्यात आली आहे. याच काळात ४८ कोटी १५ लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. ५०० चौ. फुटांचे घर असणाऱ्यांना मालमत्ता करमाफी! महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘प्रभात’ने भाजपच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासोबत संवाद साधला. त्यावेळी त्यांनी, “पाचशे चौरस फुटांपेक्षा कमी आकाराचे घर असणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबांना शून्य मालमत्ता कर, वारसा स्थळ परिसरातील जुन्या वास्तूंच्या पुनर्विकास, ७५ वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांना मोफत पीएमपी आणि महिलांना मेट्रो-पीएमपी प्रवासात सवलत देण्याचा संकल्प भारतीय जनता पार्टीने केला असल्याची माहिती माधुरी मिसाळ यांनी दिली. तसेच निवडणुकीच्या तोंडावर अशक्य आश्वासने देऊन नंतर पुणेकरांची फसवणूक आमचा पक्ष करणार नाही. पुणे हे मध्यमवर्गीय, कष्टकरी, नोकरदार, कामगारांचं शहर आहे. या समाजघटकांचे जीवनमान उंचावण्यास आमचे प्राधान्य असल्याचेही त्यांनी सांगितले. शहरातील ९०६ केंद्रांवर पोलिसांची विशेष नजर महापालिका निवडणुकीची प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या बुधवारी (दि. १५) मतदान होणार असून त्यासाठी शहरात ४०११ मतदार केंद्र असणार आहेत. या केंद्रातील ९०६ मतदार केंद्र संवेदनशील म्हणून घोषित केली असून तेथे प्रशासन तसेच पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात असल्याची माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पत्रकार परिषदेत दिली. मतदानासाठी ८०० ते ९०० मतदारांचे एक मतदान केंद्र असणार आहे. शहरात ४ हजार ११ मतदान केंद्र निश्चित केले आहेत. तसेच मतदानासाठी १४ हजार ५०० ईव्हीएमचा वापर केला जाणार असून निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी १७२ पथके तयार करण्यात आली आहेत. १६ जानेवारीला ८ ठिकाणी होणार पिंपरी-चिंचवडची मतमोजणी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार १५ जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानापूर्वी मतदान साहित्याचे वाटप तसेच मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ईव्हीएम व संबंधित साहित्याची स्वीकृती करण्यात येणार आहे. त्यानंतर १६ जानेवारीला मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने महापालिका कार्यक्षेत्रातील एकूण ३२ प्रभागांसाठी प्रत्येक ४ निवडणूक प्रभागांमागे १ याप्रमाणे एकूण ८ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मतदान व मतमोजणी प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाअंतर्गत स्ट्राँग रूम व मतमोजणीची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. शहरात आठ ठिकाणी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. पुणे महापालिकेचा जाहीरनामा प्रसिद्ध, अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र पुण्यात दोन्ही राष्ट्रीवादीकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी मंचावर उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे उपस्थित होते. महत्वाच्या पाच कामांना आम्ही प्राधान्य देणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले. त्यानुसार, नळाद्वारे नियमित पाणी, पाण्याच्या उंच टाक्या उभारणार, पुणे प्रदूषण मुक्त करण्याचा वादा, शहरातील स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावणार, नवीन शाळांना मान्यता दिली जाईल आणि शहरातील झोपडपट्टीचे पुनर्वसण केले जाईल. राज ठाकरेंचा लाडकी बहीण योजनेवर सरकारला थेट सवाल नाशिकमधील सभेतून राज ठाकरे यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची तोफ डागली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर भाष्य करत राज ठाकरे म्हणाले, सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली. या योजनंतर्गत प्रत्येक महिन्याला महिलांना 1500 रुपये दिले जात आहेत. पण महागाई किती वाढली आहे. 1500 रुपये फक्त 15 दिवसांत संपतात. घरगुती गॅस सिलेंडर आता 1000 रुपयांना मिळतो. मग अशावेळी फक्त 1500 रुपये कसे टिकणार. तुमच्या पुढच्या पिढ्या नंतर म्हणतील, आमच्या भवितव्याचा विचार कोणी केला नाही. आमचं शहर तसंच राहिलं, त्याचा विकास झाल नाही. आमचा बाप विकला गेला, आईने पैसे घेतले, त्यामुळे आमचं भविष्य चांगलं घडलं नाही, अशी तुमची मुलं म्हणतील.” धक्कादायक! बदलापूर प्रकरणातील आरोपी भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात बदलापूरमधील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपीला चक्क महापालिका निवडणुकांच्या रिंगणात उतरला आहे. बदलापूर येथील शैक्षणिक संस्थेचे सचिव तुषार आपटे यांना भाजपने कुळगाव–बदलापूर नगरपरिषदेत स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली आहे. याप्रकरणात शिपाई अक्षय शिंदे हा आरोपी असल्याचे उघड झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आणि एन्काऊंटरमध्ये त्याचा मृत्यूही झाला. मात्र चकमकीदरम्यान तो मराला गेला. याप्रकरणी बदलापूरमधील शाळेवर आरोप करण्यात आले होते. एसआयटीने शाळेतील संस्थाचलकांनाही सहआरोपी बनवून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केलेले होते. त्यातील आरोपी तुषार आपटेला निवडणुकीत संधी देण्यात आल्याने राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ‘मादुरोप्रमाणे इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांचेही अपहरण करा’ इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू हे मानवतेचे सर्वात मोठे शत्रू असून त्यांचे अमेरिकेने अपहरण करावे, अशी मागणी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजाआसिफ यांनी केली आहे. अमेरिका खरोखरच मानवतेसाठी लढत असेल तर त्यांनी मानवतेचे सर्वात मोठे शत्रू इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांचे अपहरण करावे. मादुरो यांचे अपहरण करून त्यांना अमेरिकेच्या न्यायालयात हजर करण्यात आले, त्याप्रमाणेच नेत्यानाहू यांचे अपहरण करून त्यांना एखाद्या न्यायालयात सादर करावे असे ख्वाजा आसिफ म्हणाले. त्यांच्या या अजब विधानामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर नवा वाद उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खालिदा जिया यांच्या निधनानंतर सुपुत्र तारिक रहमान यांच्याकडे बीएनपीची कमान बांगलादेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा आणि माजी पंतप्रधान खालिदा जिया यांच्या निधनानंतर, आता पक्षाची कमान त्यांचे सुपुत्र तारिक रहमान यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. शुक्रवारी झालेल्या पक्षाच्या स्थायी समितीच्या या बैठकीत सर्वसंमतीने तारिक रहमान यांची पक्षाचे नवे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. बीएनपीचे सरचिटणीस मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांनी या निर्णयाची अधिकृत घोषणा केली. तब्बल १७ वर्षांच्या वनवासानंतर मायदेशी परतलेल्या रहमान यांच्याकडे आता आगामी निवडणुकीत पक्षाला विजय मिळवून देण्याची मोठी जबाबदारी असणार आहे. तारिक रहमान हे गेल्या १७ वर्षांपासून लंडनमध्ये होते. २५ डिसेंबर रोजी त्यांचे बांगलादेशात पुनरागमन झाले आणि आता अवघ्या काही दिवसांतच त्यांच्याकडे पक्षाचे सर्वोच्च पद आले आहे. गुलशन कुमार यांना ठार मारणारा आरोपी अब्दुलचं निधन लोकप्रिय गायक गुलशन कुमार अर्थात कॅसेट किंग यांच्या हत्येच्या आरोपांखाली शिक्षा भोगत असलेल्या अब्दुल रऊफ मर्चेंट याचं निधन झालं आहे. वयाच्या 60 व्या त्याने अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून अब्दुल रऊफ मर्चेंट याची प्रकृती खालावलेली होती. यातच त्याला हृदय विकाराचा झटका आल्याने अब्दुल याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, 12 ऑगस्ट 1997 मध्ये साऊध अंधेरी येथील जीतेश्वर महादेव मंदिराबाहेर दिवसा गुलशन कुमार यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.