नाशिक – युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा सातवा टप्पा आता सुरु होत आहे. 6 फेब्रुवारी म्हणजेच उद्यापासून यात्रेला सुरुवात होत आहे.
या टप्प्यात एकूण चार दिवसांची ही शिवसंवाद यात्रा असणार असून, नाशिक, औरंगाबाद, जालना व बीड जिल्हयातून जाणार आहे. विशेष म्हणजे यापूर्वी देखील आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा काढत राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन पक्षबांधणीसाठी प्रयत्न केले होते. त्यात आता सातव्या टप्प्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीपासून सुरु होणाऱ्या या यात्रेला आदित्य यांच्यासह ठाकरे गटाचे नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील सहभागी असणार आहे.