मुंबई : राज्यात ऐन दिवाळसणाच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे.त्यामुळे राज्यातील जनतेचे हाल मोठ्या प्रमाणात होत आहेत.दरम्यान, हे आंदोलन थांबावे व एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावे,यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत
न्यायालयाने आंदोलक कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे निर्देश दिलेलेल असताना दुसरीकडे राज्य सरकारने ३५० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून बडतर्फ केलं आहे. राज्य सरकार त्यांच्याविरुद्ध अवमान याचिका दाखल करणार असल्याचं देखील परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितल्यानंतर त्यावरून आता भाजपानं टीकास्त्र सोडलं आहे.
याच मुद्यावरून आता भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी अनिल परब यांच्यावर तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे. गोपीचंद पडळकर यांनी फेसबुकवर पोस्टसह व्हिडिओ शेअर करत टीका केली आहे.
काय आहे गोपीचंद पडळकर यांची फेसबुक पोस्ट