Telangana Election Result 2023 : चार राज्यातील विधानसभा निवडणुकींच्या निकालात केवळ तेलंगणामध्ये काँग्रेसला यश मिळवता आले आहे. तर छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये भाजपने आघाडी घेतली आहे. तेलंगणातील ११९ जागांसाठी झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर यात काँग्रेसने केसीआर यांची सत्ता संपुष्टात आणली आहे. आतापर्यंत 64 जागांवर काँग्रेसने विजय मिळवला असून BRS ला 40 जागा हाती घेता आल्या आहेत. काँग्रेसच्या या आघाडीमुळे तेलंगणात काँग्रेस समर्थकांनी जल्लोष सुरू केला आहे.
तेलंगणाच्या हैदराबादमधील काँग्रेस कार्यालयाबाहेर समर्थकांनी एकत्र येत जल्लोष साजरा केला. काँग्रेस कार्यालयाबाहेर एकमेकांना लाडू वाटून आनंदोत्सव साजरा होत आहे. विशेष म्हणजे, बाय बाय केसीआर.. अशी घोषणाबाजीही यावेळी काँग्रेस समर्थकांकडून करण्यात येत आहे. इतकेच काय तर काँग्रेस समर्थकांनी सोनिया गांधींच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करत फुलांची उधळण केली. साऊथस्टाईल जल्लोष करत काँग्रेस समर्थकांनी राज्यातील सत्तांतरावर आनंद व्यक्त केला आहे.
#WATCH | #TelanganaElection2023 | Congress workers pour milk on a poster featuring Congress Parliamentary Party Chairperson Sonia Gandhi, party MP Rahul Gandhi and state party chief Revanth Reddy as the party continues its lead in the state.
As per the official EC trends, the… pic.twitter.com/IWi4QEz4EQ
— ANI (@ANI) December 3, 2023
काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनी मैदानात उतरुन काँग्रेसमध्ये प्रचार केला होता. तर, भाजपनेही दक्षिण भारतात जोर लागला होता. काँग्रेसला अपेक्षाप्रमाणे येथे यश मिळाले असून बीआरएसला मागे टाकण्यात काँग्रेसला यश आले. एमआयएमलाही राज्यात म्हणावे तेवढे यश मिळाल्याचे दिसत नाही. एमआयएमला 6 आणि भाजपला केवळ 8 जागांवर विजय मिळवता आला आहे.