मुंबई- सध्या सर्वत्र नवरात्रीचे वातावरण दिसून येत आहे. नवरात्री अर्थातच देवीची आराधना करण्याचे मंगलमय नऊ दिवस. अतिशय पवित्र अशा या नऊ दिवसांत देवीची मनोभावे पूजा केली जाते.
दरम्यान, या मंगलमय सोहळ्यासाठी सिनेसृष्टीतील कलाकारही मागे राहिले नसून त्यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री ‘तेजस्वीनी पंडीत’ हिने सुद्धा सोशल मीडियावर काही पोस्ट शेअर केल्या आहेत.
या फोटोमध्ये पावसाने हाहाकार माजवला तर दुसरीकडे महाराष्ट्रात दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली यावर भाष्य करणारे रूप तेजस्वीने धारण केले आहे. गेल्या वर्षीही तिने देवीच्या नऊ रुपातील नऊ फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले होते.