मुंबई – ‘अग्गबाई सासूबाई’ या झी मराठीवरील मालिकेतील शुभ्रा म्हणजेच अभिनेत्री तेजश्री प्रधाननं एका चांगल्या मराठमोळ्या सुनेची भूमिका साकारल्यामुळे सध्या ती बरीच चर्चेत आहे.
मालिकांमधून घराघरात पोहचलेली, मालिकेप्रमाणे प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री तेजश्री प्रधानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. विशेष म्हणजे अभिनेता शर्मन जोशीसोबत ती मुख्य भूमिकेत झळकणार आहे. ‘बबलू बॅचलर’ असं या चित्रपटाचं नाव आहे.
‘बबलू बॅचरल’ या चित्रपटात शर्मन जोशीसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. या दोघांनी याआधीही एका हिंदी नाटकात एकत्र काम केलं आहे. अग्निदेव चॅटर्जी दिग्दर्शित ‘बबलू बॅचरल’ चित्रपट 20 मार्चला रिलीज होणार असून तेजश्रीनं नुकतंच सोशल मीडियावर ‘बबलू बॅचरल’चं पोस्टर शेअर केलं आहे.
‘अग्गबाई सासूबाई’ या मालिकेतील चांगल्या प्रतिसादानं तेजश्रीला खूप लोकप्रियता मिळाली पण तीच लोकप्रियता आता ‘बबलू बॅचरल’ मधून तिला मिळणार का?, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.