त्वष्टा कासार समाज संस्था वाचनमंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त स्पर्धा संपन्न

त्वष्टा कासार समाज संस्था वाचनमंदिराच्या 43 व्या वर्धापन दिनानिमित्त स्पर्धा संपन्न

पुणे: त्वष्टा कासार समाज संस्था वाचनमंदिराच्या 43 व्या वर्धापन दिनानिमित्त रविवार 19 जानेवारी ते रविवार 26 जानेवारी पर्यंत लहान मुले मुली, युवक युवती, महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

रविवारी सकाळी 7 वाजता पर्वती चढणे ही स्पर्धा पार पडली. एकूण शंभर स्पर्धकांनी भाग घेतला. वयानुसार गटाप्रमाणे स्पर्धा घेण्यात आली. वाचन मंदिराचे अध्यक्ष यशवंत वडके, समाज संस्थेचे अध्यक्ष सतीश करडे तसेच क्रीडाप्रमुख गिरीश पोटफोडे हे या प्रसंगी उपस्थित होते. तर आनंद सराफ यांनी मुलांना मार्गदर्शन केले.

दुपारच्या सत्रात हस्ताक्षर, स्पेलिंग, स्मरणशक्ती, निबंध, चित्रकला या स्पर्धेत 75 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. संध्याकाळच्या सत्रात आमच्या परिवार संस्थांमधील सदस्यांच्या ‘भव्य क्रिकेट स्पर्धां’ चे’उद्‌ घाटन ‘ कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सवाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांचे हस्ते करण्यात आले. 26 जानेवारी 2020 पर्यंत विविध बौद्धिक, मैदानी खेळांचे तसेच वक्तृत्व , विविध गुणदर्शन, फॅन्सी ड्रेस अशा अनेकविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते .वेदिका कडू हिने वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला. तर नृत्य स्पर्धेत सुहानी डेरे आणि नृत्य शिक्षिका तेजश्री कडू यांनी बहारदार नृत्य सादर केले.तर शौनक को-हाळकर हा विद्यार्थी उत्कृष्ट कार्यकर्ता आणि सई मेहेर ही उत्कृष्ट कार्यकर्ती ठरली स्पर्धांमधील विद्यार्थ्यांना सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते,साईनाथ मंडळ ट्रस्ट चे पीयूष शहा यांनी मार्गदर्शन केले आणि आदर्श मित्र मंडळाचे सामाजिक कार्यकर्ते उदय जगताप यांचे हस्ते मुलांना बक्षिसे देण्यात आली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.