कार्ला, (वार्ताहर) – राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे जिल्हा व प्रशिक्षण संस्था तसेच मावळ तालुका पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुका स्तरीय माध्यमिक व उच्च माध्यमिक इयता ९ वी ते १२ वी शिक्षक क्षमता वृध्दी प्रशिक्षणास सुरवात झाली आहे. पहिल्या टप्याला सुदुंबरे येथील सिध्दांत कॉलेजमध्ये प्रशिक्षणास सुरवात झाली आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० लागू झाले असून भारताचा शैक्षणिक धोरणात आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. यात शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, भाषा, तंत्रज्ञान, अर्थ विषयक बाबी व अंमलबजावणी यामध्ये मूलभूत बदल झाले आहेत. शिक्षणाचा आकृतिबंधामध्ये झालेला बदल माहिती, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची दुरदृष्टी, उदिष्टांची माहिती शिक्षकांना व्हावी, हेतूने या प्रशिक्षण घेण्यात येत आहे.
पहिला टप्प्यात तीन दिवस सुदुंबरे येथे तर दुसरा टप्पा बालविकास तळेगाव येथे होणार आहे. मावळ पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांंच्या मार्गदर्शनाखाली सिद्धांत इंजिनिअरिंग कॉलेजचे उपप्राचार्य डाॕ उत्तम शिंदे, सविता पाटील, बिलकीसबानो अंन्सारी,
केंद्रप्रमुख गंगाराम केदार, पांडुरंग डेंगळे, पोपटराव चौगुले यांची समिती प्रशिक्षण समन्वयक म्हणून काम पाहत आहे. तसेच प्रशिक्षणासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रवीण कुमार हुलावळे, अनिल सातकर, श्रीहरी पावशरे, कल्याणी जोशी, हनुमंत बोरबाले, अमजद पठाण, विशिष्ट गटकुळ, रेवजी अहिरराव, हसन शिकिलकर, किसन पाटील यांचे मार्गदशन लाभत आहे.