मुंबई – साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या आगामी चित्रपट पुष्पा 2 ची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. अभिनेताही या चित्रपटासाठी खूप मेहनत घेत आहेत. दरम्यान, अल्लू अर्जुनने कुटुंबासाठी वेळ काढला आणि तो थेट रणथंबोरमध्ये कुटुंबासह जंगल सफारीला गेला. आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अल्लू आपल्या कुटुंबासोबत जंगल सफारीचा आनंद घेताना दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये अल्लू अर्जुन त्याच्या कुटुंबासह दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार अल्लू अर्जुन रणथंबोरमध्ये 2 दिवस राहिला होता. यावेळी त्याने पत्नी स्नेहा, मुलगा अयान आणि मुलगी अरहासोबत पिकनिक एन्जॉय केली. तसेच यादरम्यान त्याने कुटुंबियांसोबत अनेक वेळा जंगल सफारीचा आनंद घेतला.
ALLU ARJUN Did Tiger Safari At Ranthambhore On Friday Morning 🔥🔥@alluarjun 🔥#AlluArjun #Desamuduru4K #PushpaTheRule #AlluArjun𓃵 #PushpaTheRise #Pushpa2 pic.twitter.com/hSe5Tou8fS
— Demi God Bunny ❤️ (@DEMI_GOD_BUNNY) February 28, 2023
अल्लू अर्जुनने पुष्पा चित्रपटात साकारलेली चंदन तस्कराची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. म्हणून प्रेक्षक देखील पुष्पाच्या दुसऱ्या पार्टची वाट पाहत आहेत. दुसऱ्या पार्टचे शूटिंग सुरु झाले असून लवकरच चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 2023 च्या अखेरीस पुष्पा 2 रिलीज होण्याची अपेक्षा आहे.